दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
अनवडी गावचे सुपुत्र रामदास धुमाळ यांनी गणेश ट्रेडींग कंपनी या नावाने ना नफा ना तोटा सुरु केलेले सर्व प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूंचे दुकान अल्पावधीत नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस
उतरेल असा विश्वास वाई पंचायत समितीचे
सदस्य मधुकर भोसले यांनी शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.
वाई वाठार रस्त्यावरील जोशीविहीर या मध्यवर्ती
ठिकाणी वाई तालुक्याच्या पुर्व भागातील नागरीकांच्या सोईसाठी अनवडी गावचे उद्योजक व माजी उपसरपंच रामदास धुमाळ यांनी गणेश ट्रेडींग कंपनी या नावाने स्मॉल मार्ट उभे केले आहे.
त्याची सुरुवात वाई पंचायत समितीचे सदस्य मधुकर भोसले यांनी केली. यावेळी रामदास धुमाळ यांनी ग्राहकांना नामवंत कंपनीच्या
विविध वस्तूंचा पुरवठा दर्जेदार सेवेतून मिळेल असे मत व्यक्त केले.