लोणार सरोवर खरच जगातील आठ आश्चर्य पैकी एक :- सचिव डी आर शेखर
संदीप मापारी पाटील, बुलढाणा
१६ ऑगस्ट रोजी भारतीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांचे मुख्य सचिव डी आर शेखर व उपसचिव निशांत महेश तसेच खासदार प्रतापराव जाधव यांचे खाजगी सचिव राहुल सोळंके यांनी लोणार सरोवराला भेट दिली.
त्यांनी सरोवर परिसरातील निसर्गरम्य वातावरणात सरोवराची पाहणी केली. शिवछत्रमित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी, अरुण गीते, पत्रकार पवन शर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्या नंतर सरोवराच्या सर्व निसर्गरम्य ठिकाणी त्यांनी सरोवराला परिक्रमा केली.
त्या नंतर वनकुटी येथे थांबून सरोवर बदल गाईड रमेश राठोड यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. या मध्ये किती प्रकारचे दगड मिळून येतात, कोणत्या दगडाचे काय महत्व आहे, तसेच इजेक्टा ब्लेंकेट म्हणजे काय तसेच लोणार सरोवरातील पाण्याबाबत माहिती सांगताना रमेश राठोड यांनी माहिती दिली.
राठोड यांनी सांगितले की, सरोवराचे पाणी हे हाय अलक्लेन वॉटर आहे. त्यामध्ये त्या पाण्याचा पी.एच. १०.५ आहे. त्या मध्ये हाय प्रोटीन शेवाळ असल्याने त्यामध्ये कोणतेच जीवजंतू राहत नाहीत. तसेच या पाण्यात हळद टाकून प्रयोग करून दाखवले असता त्या पाण्याचा रंग लाल झाला.
त्या नंतर परत लिंबूचा रस मिसळला असता परत पाणी पहिल्या सारखे झाले. या नंतर त्यांनी पवित्र धारतीर्थाची पाहणी केली. त्या ठिकाणच्या जुन्या पुरातन काळाच्या शिवमंदिर, कार्तिक मंदिर आणि धारतीर्थ बदल माहिती जाणून घेतली.
या वेळी बोलतांना सचिव डी आर शेखर म्हणाले की, खरच लोणार सरोवर हे जगातील आठवे आश्चर्य म्हणावे लागेल. या ठिकाणी खूप काही बघण्यासारखे आहे. पुरातन काळातील दैत्यसुदन मंदिर, मोठा मारोती संस्थान, सरोवर, पवित्र धार तीर्थ खरच खूप मनमोहक असे निसर्गरम्य वातावरण आहे.
या ठिकाणी देश विदेशातून पर्यटक येतात हे खूप चांगले पर्यटन स्थळ आहे. असे केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडून ऐकलं होते. परंतु आज हे पाहण्याचा मोह आवरला नाही व आम्ही या ठिकाणी आलो.
या वेळी वन्यजीव अभयारण्याचे कर्मचारी सरकटे, पोलीस विभाग गोपनियचे संतोष चव्हाण, विशाल धोंडगे, उबेद खान, प्रभू आखाडे उपस्थित होते.