इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १५ व बाहेरील ५ चोरीला गेलेल्या मोटरसायकली छडा लावण्यास इंदापूर पोलिसांना यश आले आहे. यासाठी एक खास मोहीम राबवून गुप्तमाहिती च्या आधारे मोटर सायकली चोरीचा तपास लावला गेला असून या मोहिमेस पंढरपूर पोलिसांचे सहकार्य लागले आहे.
या सर्व मोटरसायकली हस्तगत करण्यात आले असून मोटरसायकली चोरी प्रकरणी ३ अल्पवयीन मुलांसह इतर ६ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे म्हणाले, की दरोड्याचा प्रयत्न करत असलेली टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
यामध्ये राजू मोहन चव्हाण, अनिल अंकुश काळे (वेळापूर) निखिल पोपट लोंढे (माळशिरस) तिघेजण तसेच या मध्ये ३अल्पवयीन आरोपी आढळून आले असून अशा सहा लोकांची टोळी सापडली. याच बरोबर महेश कांतीलाल नवले (माढा), सिद्धार्थ उर्फ अमोल मुसळे (माढा) सदाशिव महादेव फडतरे (पंढरपूर) असे तिघे असे एकूण नऊ आरोपी मिळाले आहेत.
सदर कारवाई पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनवे, पोलीस उप निरीक्षक माने, धोत्रे, दाजी देठे, पोलीस नाईक मड्डी, मोहिते, चौधर, पो कॉन्स्टेबल वाघमारे,पोलीस हवालदार वाघमारे, सहाय्यक फौजदार रासकर , पोलीस मित्र अनिल शेवाळे, महादा गोरवे आदींनी केली.
जप्त केलेल्या मोटरसायकली मालकांनी तक्रार दिलेली असेल तर, तसेच मोटार सायकलची कागदपत्रे घेऊन इंदापूर पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी केले आहे.