इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर इंदापूर प्रशालेत आज ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर आणि नारायणदास रामदास इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड आणि फैजिया शेख यांनी ध्वजारोहण केले. तसेच आंँनलाईन झूम अँपच्या माध्यमातून शाळेतील १५६ मुलांनी आणि पालकांनी सहभाग घेतला.
मुलांनी नृत्य, भाषण, गायन या माध्यमातून सुमारे ४७ विद्यार्थ्यांनी वेशभूषासह आणि घरी स्वातंत्र्य दिनानिमित्त सुशोभीकरण करून सहभाग घेतला. सदर कार्यक्रम जवळजवळ दोन तास मुलांच्या विविध गुणदर्शनासह चालू होता.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यांनी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना संस्थेच्या आणि प्रशालेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सौ. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार प्रदर्शन नंदा बनसुडे यांनी केले. या कार्यक्रमास ना. रा. ज्युनिअर कॉलेजचे प्रा. बी. एस. झगडे, आशा माने, संतोषी बनकर, दीपाली पाटील, अमृता शिंदे, अर्चना जामदार, निलोफर शेख, अर्चना दिक्षित, विश्वास गाढवे उपस्थित होते.
शिक्षकेतर कर्मचारी यशवंत किसवे, सुनीता चव्हाण, वैशाली पवार यांनी सहाय्यक म्हणून काम केले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी पाटील आणि उपाध्यक्षा पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा तसेच सर्व संस्थाचालकांनी कौतुक केले.