सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
पुणे – सोलापूर महामार्गावरील चोरी,मारामारी करणारांवर जरब बसावी व इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी तसेच महामार्गावर अपघात झाल्यावर त्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी लोणी देवकर तसेच पुणे जिल्ह्याच्या सीमेवर हिंगणगाव येथे उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून जनतेला मदत मिळणार आहे. लोणी देवकर येथील 17 गावे व हिंगणगाव येथील 17 गावांना या मदत केंद्रांचा उपयोग होणार आहे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इंदापूर पोलिस स्टेशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या लोणी देवकर पोलीस मदत केंद्र व हिंगणगाव पोलिस मदत केंद्राचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थित होते.
लोणी देवकर पोलीस मदत केंद्र अंतर्गत लोणी देवकर, काळेवाडी नं 1, काळेवाडी नं 2, माळेवाडी, पळसदेव, चांडगाव, भावडी, अगोती 1, अगोती नं 2, अगोती नं 3, गंगावळण, कळाशी, कालठण नं.1, वरकुटे बुद्रुक, राजवडी, लोणी – देवकर, वनगळी, गलांडवाडी नं. 1, गागरगाव अशी एकूण 17 गावे आहेत.
या पोलीस मदत केंद्रासाठी प्रभारी पोलीस अधिकारी महेश माने व पोलीस अंमलदार ढवळे , पोलिस हवालदार श्री. वाघ, पोलीस नाईक तारळकर, जगताप ,भोंगळे, पोलीस शिपाई केसकर, कदम, काळे आदी लोणी देवकर पोलीस मदत केंद्राचे कामकाज पाहणार आहेत.
तर हिंगणगाव पोलीस मदत केंद्र अंतर्गत
अवसरी, बेडशिंगे, भाटनिमगाव, हिंगणगाव, बाभुळगाव, सरडेवाडी ,कांदलगाव, शहा, महादेव नगर, पिंपरी बुद्रुक, सुगाव,पडस्थळ, चिंदादेवी, आजोती, शिरसोडी, गलांडवाडी नंबर 2 ,कालठण नंबर 2 अशी एकूण 17 गावे असून पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे हे काम पाहत आहेत.
पोलीस अंमलदार, सहाय्यक फौजदार जाधव, पोलीस हवालदार नागराळे, पोलीस नाईक चव्हाण, खान, पोलीस शिपाई तारळेकर, श्री. जगदीश चौधर, पोलीस शिपाई फडणीस व, पोलीस शिपाई मदने हे सदर ठिकाणी पोलीस अंमलदार कायम मिळणार आहेत.
या परिसरामध्ये चोरीचे प्रमाण मारामारीचे प्रमाण इतर गुन्ह्याचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच अपघात झाल्यानंतर तात्काळ पोलीस मदत मिळणार आहे. टोल नाका किंवा इतर ठिकाणी अपघात किंवा इतर कारणास्तव जर रोडवर ट्रॅफिक जाम झाले तर लगेच महामार्ग वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी पोलिसांची मदत ही तात्काळ मिळणार आहे.
तसेच वाळू चोरांवर मोठ्या प्रमाणावर अंकुश बसणार आहे. जिल्ह्याची सीमा असल्यामुळे ज्या वेळेस एखादा चोर किंवा गुन्हेगार जिल्हा बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करेल, त्यावेळेस त्यालाही तात्काळ पकडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार आहे, अशी माहिती त्यांना ग्रुप पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली.