पुणे : महान्यूज लाईव्ह
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका हे महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या आणि अगदी जगाच्या इतिहासालाही सोनेरी किनार लाभलेले इतिहासाचे पान आहे.. महाराज राजगडावर सुखरूप पोचले होते, तो दिवस होता 17 ऑगस्ट 1966… दोन दिवसांनी म्हणजेच 17 ऑगस्ट 2019 रोजी या घटनेला 355 वर्ष पूर्ण होत आहेत..
यानिमित्ताने येत्या 17 ऑगस्ट पासून आग्रा ते राजगड अशी गरूडझेप मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये 13 दिवसात 30 मावळे आग्रा पासून शिवज्योत घेऊन धावणार आहेत. तब्बल बाराशे किलोमीटरचे हे अंतर आहे. 29 ऑगस्ट रोजी हे 30 मावळे आग्र्याहून आणलेली शिवज्योत राजगडावर घेऊन येणार आहेत. हे मावळे रोज शंभर ते दीडशे किलोमीटर अंतर पार करणार आहेत.
या मोहिमेत ज्या मार्गावरून हे मावळे येणार आहेत, त्या मार्गावर विविध ठिकाणी शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. या आग्रा येथून माती आणून ती राजगडावर एक रोपासाठी वापरली जाणार आहे.
या गरुड झेप मोहिमेत राजू सातपुते, अनिल पवार, अंकुश ढोरे, श्यामराव ढोरे, मारुती गोळे, शेखर जावळकर, प्रशांत साळेकर, दिग्विजय जेधे, सुरज ढोली, नितीन चव्हाण, विशाल शिंदे, नारायण चांदेरे, मंदार मते, मनोज जाधव, अतुल ढोरे, ढोरे गणेश जाधव, नितीन चव्हाण, श्रीनिवास कुलकर्णी, चैतन्य बोडके, महेश मालुसरे, विनायक दारवटकर, किरण शेळके, अशोक सरपाटील, संदीप ससार, सुनीत लिंबोरे, किशोर चौधरी, राजेंद्र बेंद्रे, हनुमंत जांभुळकर, विलास मोरे, सागर थरकुडे आदी सहभागी होणार आहेत.