महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
एकदा ठेचलेली नागी पुन्हा वर होत नाही, मात्र तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. त्याची प्रचिती अशा पद्धतीने आली आहे की, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देश सोडला.
अफगाण सरकारमधील अनेक नेते पाकिस्तानला पळून गेले आहेत. त्यामुळे ही जागतिक स्तरावरील अत्यंत भयावह परिस्थिती आहे आणि त्याचे परिणाम भारताला देखील भोगावे लागतील अशी स्थिती आहे.
Afghanistan President Ashraf Ghani has left that country, reports TOLOnews quoting sources
— ANI (@ANI) August 15, 2021
(File photo) pic.twitter.com/yOvHUyfjO4
तालिबानचा पूर्णपणे पाडाव केल्यानंतर अमेरिकेने आणि मित्र राष्ट्रांनी आपले सैन्य माघारी बोलावले आणि तालिबानने पुन्हा उचल खाल्ली. तालिबानच्या आक्रमकतेपुढे एका देशाचा निभाव लागलेला नाही ही जागतिक स्तरावरील शांततेची फार मोठी धोक्याची घंटा आहे.
बघता-बघता अफगाणिस्तान पुन्हा एकदा तालिबान च्या ताब्यात गेला असून, आता अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबानचे राज्य येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. चर्चेनुसार तालिबानी कमांडर अब्दुल गणी बरादर हे अफगणिस्तान चे नवे राष्ट्रपती होऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली असून, राष्ट्रपती अश्रफ गनी यांना सुरक्षित स्थळी सोडण्यासाठी अमेरिकेने मदत केल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे.
यासंदर्भात अश्रफ गणी यांनी तालिबान बरोबर शांततेच्या चर्चा सुरू केल्या होत्या. परंतु त्यांच्याकडे देश सोडून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. गुन्हेगारी साम्राज्य एखाद्या ठिकाणी वाढल्यानंतर चांगल्या माणसांना माघार घ्यावी लागते. तशाच स्वरूपाची प्रचिती आता अफगाणिस्तानात येत असून अफगणिस्तानच्या शांततेसाठी भारताने मोठा पुढाकार घेतला होता. त्याच बरोबर भारताने तेथे मोठ्या प्रमाणावर कामे केली होती. मात्र आता ही कामे देखील पाण्यात गेली आहेत.