• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

घरपोच पोषण आहार
सरकारचा हेतू शुद्ध, उच्च न्यायालयाचा निर्वाळा!
राज्य सरकारच्या निर्णयावर कोर्टाचे शिक्कामोर्तब!

Maha News Live by Maha News Live
August 14, 2021
in मुंबई, आरोग्य, कामगार जगत, राज्य, Featured
0

मुंबई : महान्यूज लाईव्ह

कोविड काळात गरम ताजा आहार पुरवण्याच्या कामास तात्पुरती स्थगिती देऊन घरपोच आहार पुरवण्याच्या शासनाच्या हेतू बाबत समाधान व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवला आहे.

कोविडच्या अभूतपूर्व परिस्थितीतही अखंडित पोषण आहार पुरवण्याच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांप्रमाणे राज्य सरकारने लाभार्थी बालके, स्तनदा माता तसंच गर्भवती महिलांना पोषण आहार पुरवण्याच्या दृष्टीकोनातून अपवादात्मक परिस्थितीत उचललेले पाऊल योग्यच असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

योगेश्वरी देवी महिला बचत गट, तमन्ना महिला बचत गट, रेणुकामाता महिला बचत गट, भारती महिला बचत गट, शिवशक्ती महिला बचत गट, सरस्वती महिला बचत गट, नेहरू युवती आणि साई सखी बहुउद्देश्यीय सामाजिक संस्था आणि जिजामाता महिला बचत गट यांनी मुंबई उच्चन्यायालयात याचिका दाखल करून घरपोच पोषण आहार योजनेला आव्हान दिले होते.

शासनाच्या निर्णयामुळे बचत गटांकडून गरम ताजा आहाराचे काम महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक फेडरेशनला घरपोच आहार पोहचवण्याचे काम दिल्याबद्दल याचिकाकर्त्यांनी नापसंती दर्शवली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारची भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे.

कोविड काळात शाळा तसेच अंगणवाडी बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र तसेच राज्य सरकारने घेतला होता. राज्याच्या आपदा नियंत्रण विभागाने ही वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे कोविड चा संसंर्ग टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या.

आपत्ती व्यवस्थापन विभाग ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे राज्य सरकारने घरपोच आहाराचा निर्णय घेतला होता. आपत्कालीन स्थितीत राज्य सरकार अशा पद्धतीचे निर्णय घेऊ शकते.

ही तात्पुरती व्यवस्था आहे, आणि कोविड संपुष्टात आल्यानंतर पुन्हा गरम ताजा आहार पुरवण्याबाबत राज्य सरकारने ग्वाही दिलेली असल्याने राज्य सरकारच्या हेतूवर संशय घेता येणार नाही असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

सध्या सर्व अंगणवाडी बंद आहेत. कोविड ची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकार याबाबत निर्णय घेईल. राज्य सरकार जाणीवपूर्वक घरपोच आहाराची मुदत वाढवत आहे, असे वाटत नाही.

सध्याची परिस्थिती राज्य सरकारच्या नियंत्रणापलिकडची होती असे निरीक्षण न्यायालयाने व्यक्त केले आहे. या वेळी झालेल्या सुनावणीत, हा परिस्थितीनुरूप घेतलेला निर्णय आहे.

कोविडची परिस्थिती निवळताच पूर्वीचे निर्णय पुन्हा लागू करण्याबाबत राज्य सरकारने भूमिका व्यक्त केली. लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे असल्याने हा निर्णय घेतला गेला आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. जर सामान्य परिस्थितीत असा निर्णय घेतला गेला असता तर आक्षेप घेण्यास वाव होता असं मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

एक सर्वसामायिक व्यवस्थेच्या माध्यमातून प्रभावीरित्या या योजनेचे कार्यान्वयन होणे हे लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने राज्य सरकारचा हा निर्णय योग्य ठरतो असं मत न्यायलयाने व्यक्त केले आहे.

कोविडच्या अनन्यसाधारण परिस्थितीत लाभार्थ्यांना अन्न पुरवठ्याच्या व्यवस्थेला खीळ घालणे लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे तसंच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या उद्दीष्टांपासून फारकत घेतल्यासारखे होईल, असे म्हणत न्यायलयाने बचतगटांमार्फत दाखल याचिका फेटाळून लावली आहे.

Next Post

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस येथे अपघात, भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने मेंढपाळ युवतीला दिली धडक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group