बारामती : महान्यूज लाईव्ह
15 जुलै 2020 या दिवशी बारामतीत पहिल्या कोरोना ग्रस्ताला त्यांनी अंतिम निरोप दिला. ज्या काळात कोरोना च्या रुग्णाच्या संपर्कात अथवा रुग्णाच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीत ही कोणी फिरकत नव्हते, त्या काळापासून त्यांनी जीवाची पर्वा न करता या कामाला सुरुवात केली होती.
आज ही संख्या 1472 मृतांपर्यंत पोहोचली.. ज्यांचे कोणी नाही, त्यांचे खांदेकरी बनलेल्या बारामती नगरपालिकेच्या 14 कोरोना योध्द्यांचा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यथोचित सन्मान केला. तेव्हा आजपर्यंत केलेल्या साऱ्या कष्टाचे चीज झाल्याचा आनंद त्या अकरा जणांच्या चेहऱ्यावर झळकत होता
आज उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत आल्यानंतर त्यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. या आढाव्यादरम्यान त्यांनी बारामतीत गेल्या दीड वर्षापासून कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारात काम करणाऱ्या नगरपालिकेच्या उद्यानविद्या व आरोग्य विभागातील 14 जणांचा त्यांनी सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला.
यामध्ये विजय लक्ष्मण शितोळे, मजीतखान अजितखान पठाण, राजेश रंजन लोहाट, विनोद सुभाष शिरसागर प्रशांत जयकुमार रणपिसे गणेश तानाजी दोडके साजन बाळू खोमणे राजू लहू पवार युवराज नरेश खिराडे अजय संजय खरात पंकज राजू पवार सलीम बाबू शेख चेतन राजेंद्र चव्हाण व नितीन महादेव शिंदे या चौदा जणांचा समावेश होता.