बीड : महान्यूज लाईव्ह
माणसाचा जन्मच जंगलातून झाला आहे. आज काही जण जंगलात राहणारांना वनवासी आणि आदीवासी म्हणून हिणवत आहेत. मात्र भारतीय राज्यघटनेने त्यांनाही जगण्याचा मुलभुत अधिकार आणि न्याय हक्क प्रधान केले आहेत.
आज आदिवासी हा आपली संस्कृती उत्सव विसरला नाही. आदिवासी दिन हा प्रत्येक आदीवासी समाजाच्या घरा घरात एक मोठा उत्सव म्हणून साजरा करण्याची गरज आहे. असे मत साहित्यिक नामदेव भोसले यांनी व्यक्त केले.
आंतराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिना निमित्त बीड येथील अदिवासी समीकरण अनाथ सेवा प्रकल्प या आश्रमशाळेत नुकताच आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आदिवासी साहित्यिक नामदेव भोसले हे बोलत होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना भोसले म्हणाले की, आदीवासी समाज आजही जंगलाची जपणुक आणि त्याचे रक्षण करीत आहेत. आदिवासी समाजाने आता परिवर्तानाच्या लाटेत सहभागी झाले पाहिजे, डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला महामंत्र शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
यानुसार आता वाटचाल केली पाहिजे, स्वावलंबी, सशक्त समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था, अस्मिता, स्वाभिमान, संस्कृती ओळख जतन करण्यासाठी सज्ज व्हायला हवे. जल, जंगल, जमीन, जीव यांचे जतन करून निसर्ग तसेच सर्व समावेशक जीवश्रुष्टी यांच्या शाश्वत विकासाची मूल्य आदिवासी संस्कारात आहेत.
या विषयी संवेदना जागृत करण्यासाठी प्रत्येक पातळीवर पूरक प्रयत्न करूया. असे मत भोसले यांनी व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमेश्वर काळे, संतोष मानुरकर, वसंत मुंडे,
बबीताई काळे, सचिन भोसले, माजी सरपंच संजय भोसले, आरबिनाथ काळे, बापु काळे, आनंद काळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरव भोसले यांनी केले तर सुधीर भोसले यांनी आभार मानले.