सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील विशाल हनुमंत जाधव या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस आज सकाळी अचानक शॉर्टसर्किट होऊन पेटला. या आगीत एक एकर अत्यंत चांगल्या प्रतीचा ऊस पूर्णपणे जळून गेला.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता
दरम्यान महावितरणने सुरू केलेल्या वीज जोडणी तोडण्याच्या मोहिमेत मोहिमेत विशाल जाधव यांचीही कनेक्शन कट करण्यात आले होते. त्यामुळे ऊस पेटल्यानंतर सरीमध्ये पाणी सोडून पेटलेल्या उसाची साखळी तोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु तो साध्य होऊ शकला नाही. त्यामुळे संपुर्ण एक एकर ऊस जळून गेला असा आरोप विशाल जाधव या शेतकऱ्याने केला आहे
इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील चव्हाणवाडी परिसरात जाधव यांची शेती आहे. या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी कौतुक केलेला अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढविलेला ऊस आज सकाळी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला.
दरम्यान जाधव यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि इतरांनी केलेल्या तत्परतेमुळे आणखी एक एकर ऊस त्यांनी आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचवला. अत्यंत वेगाने व जीवाची शर्थ करून उसाची एक सरी तोडली. त्यामुळे पुढे आग पोचू शकली नाही. तोपर्यंत छत्रपती कारखान्याचे अग्निशामक दलाचे वाहन त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
या साऱ्या गोष्टीनंतर शेतकऱ्यांनी त्याचा सगळा राग महावितरण वर काढला असून वीज कनेक्शन कट केल्यामुळेच आम्ही आमचा ऊस वाचवू शकलो नाही. या खेरीज शॉर्टसर्किटमुळेच हा माझा ऊस पेटला असल्याचा दावा विशाल जाधव यांनी केला.