बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील तांदळवाडी वेस तरुण मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत पाठवण्याच्या मोहिमेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते शुभारंभ झाला. त्याचबरोबर सायंबाचीवाडी गावातील स्वर्गीय तुकाराम भापकर प्रतिष्ठानने बारामती परिसरातील झाडे जगवण्यासाठी पाच टँकर भेट दिले.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्युज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता
या कार्यक्रमावेळी अजित पवार यांनी फोटो काढून घेताना थेट कार्यकर्त्यांना, ‘ज्यांनी कामे केली आहेत त्यांनीच फोटोसाठी पुढे या’, फक्त मिरवणारे येऊ नका’ अशा स्पष्ट शब्दात त्यांनी कानपिचक्या दिल्या. त्याची चर्चा आज बारामतीत सुरू राहिली.
अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी बारामतीत सकाळपासून विकासकामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या माहिती व तंत्रज्ञान विभागात कोरोना च्या सद्यस्थितीचा आढावा घेतला व भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांची भेट घेतली.
यावेळी यादगार सोशल फाउंडेशन, तांदुळवाडी वेस तरुण मंडळ, त्याचबरोबर स्वर्गीय तुकाराम भापकर प्रतिष्ठान सायंबाचीवाडी या सर्व संस्थांनी दिलेल्या मदतीची पाहणी करून पूरग्रस्तांना मदत पाठवण्याच्या मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी कार्यकर्त्यांसमवेत छायाचित्र काढताना त्यांनी वरील कानपिचक्या कार्यकर्त्यांना दिल्या.