बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील विकास कामांची पाहणी करण्याची वेळ सहा वाजल्यापासून या विकास कामांना सुरुवात होते आणि आठवडाभरात झालेल्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी करतात.. गरज पडेल तिथे उजळणी घेतात आणि आवश्यकता असेल तिथे खरडपट्टी देखील काढतात..! त्याला आजचा म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व दिवसाचा दिवस देखील अपवाद नव्हता..!
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता
आज शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत विविध विकासकामांची पाहणी केली व पंचायत समिती कार्यालयाची त्यांनी पाहणी केली. त्याचबरोबर निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण व इतर विकास कामाची पाहणी केली.
यामध्ये पंचायत समितीच्या संपूर्ण कामकाजाची पाहणी करताना त्यांनी आवश्यक त्या ठिकाणी सूचना दिल्या. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या आवश्यक गोष्टी होत्या, त्यांची देखील त्यांनी आखणी अधिकाऱ्यांना मांडली.