सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
“नागपंचमी” श्रावण महिन्यातील पहिला सण. ग्रामीण भागातील मुलांसाठी नागपंचमी म्हणजेच पतंग उडवण्याचा दिवस. आता खरे तर पतंग उडविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे..
पण म्हणून मोठ्यांना जुन्या आठवणी आठवणार नाहीत, असं होणारच नाही.. त्यामुळेच आज तालुक्याचा दौरा आटोपल्यानंतर घरी गेल्यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुलांच्या हातून पतंगाचा डोलारा स्वतःकडे घेतला आणि ढिल देत पतंगबाजी केली..!
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता.
इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे व सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे गाव..! नागपंचमी असल्याने दिवसभर इतर ठिकाणच्या भेटीगाठी झाल्यानंतर आज भरणे जरा लवकरच गावाकडे घरी पोहोचले.
तेव्हा घरातील मुले पतंग उडवताना दिसली आणि भरणे यांना जुने दिवस आठवले. त्यांनी लगेचच पतंगाचा दोरा हातात घेतला आणि पतंगाला ढिल देत पतंग उडवला. हे दृश्य कॅमेरात टिपण्याचा कार्यकर्त्यांना मोह आवरला नाही आणि त्यातूनच एक व्हिडिओ समोर आला..!