किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
‘ सदऱक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन पुणे ग्रामीण पोलीस दलात आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटविणारे कर्तव्यदक्ष पोलीस बी.जे पाटील यांची पोलीस हवालदार पदी भवानीनगर पोलीस औटपोस्ट येथे बढतीने नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आज सत्कार करण्यात आला.
सणसर येथील ॲड रणजीत भैय्या निंबाळकर मित्र परिवाराच्या वतीने आज पाटील यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. भवानीनगर तसेच पंचक्रोशीतील पोलीस औटपोस्टच्या कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य नागरिकांना बी.जे.पाटील यांच्या रूपाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाला आहे. त्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहून यापुढील काळात जनतेची सेवा करावी असे मत श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक व सणसर चे सरपंच ॲड रणजीतसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केले.
यावेळी इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष सोमनाथ ( पिंटू ) गुप्ते, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप निंबाळकर, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष नितीन निंबाळकर, माजी सरपंच यशवंत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गोरख कसपटे, पोलीस कॉन्स्टेबल होळकर ,सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील, नानासो बिचकुले, शशी निंबाळकर, संजय धोत्रे, बबन दादा पवार, प्रतीक ढाकणे, अविनाश गडदे, अजित निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.