महान्यूज करियर अपडेट
युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 347 जागांची भरती होणार आहे. या करता 3 सप्टेंबर ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. ही सर्व पदे मुंबई येथील जागेसाठी भरली जाणार आहेत.
यासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे असून कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी ही सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी शैक्षणिक अर्हता आहे. तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदविका व पदवी ही व्यवस्थापक पदासाठी शैक्षणिक अर्हता असणार आहे.
वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी अर्थशास्त्रातून एमबीए पदवी मिळवलेला अथवा जी ए आर पी प्रमाणपत्र असलेला उमेदवार यासाठी पात्र असेल. या भरतीसाठी अर्ज शुल्काची किंमत ही 800 रुपये असून 12 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या दरम्यान ऑनलाइन अर्ज करावयाचे आहेत.
यामध्ये समांतर व सविस्तर आरक्षणासंदर्भात आणि अर्जाच्या माहिती संदर्भात संकेतस्थळावर संपर्क साधावा. वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराची वयोमर्यादा ही किमान 30 व कमाल 40 वर्षे असावी. वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या उमेदवारासाठी सी ए; सीएमए अथवा व्यवस्थापन शास्त्राची अर्थशास्त्रातून 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असलेली पदवी अथवा गणित या विषयात मास्टर अथवा सांख्यिकी किंवा अर्थशास्त्र पदवी 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी.
व्यवस्थापक पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराची वयोमर्यादा किमान 25 व कमाल 35 वर्षे असावी. याकरिता शैक्षणिक अर्हते मध्ये वरील प्रमाणेच शैक्षणिक अर्हता असेल तर उत्तम! याखेरीज जीआरपी प्रमाणपत्र किंवा सीए अथवा सी एम ए अथवा सी एस ही पदवी तसेच किमान दोन वर्ष मुदतीचे व्यवस्थापनशास्त्र पदवी अर्थशाखेतून 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
अभियांत्रिकी शाखेतून व्यवस्थापक पदाकरता वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 25 वर्षे व कमाल 35 वर्षे आहे. स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतून बी बीटेक अथवा पदवी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावी. आर्किटेक्ट शाखेतील व्यवस्थापक पदासाठी वयोमर्यादा वरील प्रमाणे असून आर्किटेक्चर शाखेतून बॅचलर डिग्री साठ टक्के गुणांसह उत्तीर्ण असावी, तसेच किमान तीन वर्षाचा अनुभव असावा.
या भरतीनंतर दोन वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी असून, ही भरती होताना ऑनलाइन परीक्षा गटचर्चा अथवा वैयक्तिक मुलाखत घेतली जाणार आहे. यातील अधिक व सविस्तर माहितीसाठी बँकेच्या https://unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.