महान्यूज करियर अपडेट
राज्यातील अमरावती, कोल्हापूर, नागपूर व सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये या महिन्यांमध्ये पंडित दीनदयाळ जॉब फेअर चे आयोजन करण्यात आले आहे. हा ऑनलाईन मेळावा असून, यामध्ये थेट भरतीच्या सुवर्णसंधी असणार आहेत.
सोलापूर येथील रोजगार मेळावा हा 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. सोलापूर मधील रोजगार मेळावा मध्ये ऑपरेटर वेल्डर फिटर ट्रेनिंग आणि हेल्पर याच्या 158 पेक्षा अधिक जागांची भरती होणार असून हा पूर्णपणे ऑनलाईन जॉब फेअर असणार आहे 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान सोलापुरात हा रोजगार मेळावा होत आहे याकरता शासनाच्या www. mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
नागपूर येथेही हा रोजगार मेळावा ऑनलाईन होणार असून 13 ऑगस्ट 2019 रोजी हा मेळावा होणार आहे.
कोल्हापूर रोजगार मेळावा 23 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान भरती होणार आहे. देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉमर्स कॉलेज बिंदू चौक कोल्हापूर येथे या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ज्या जागांची भरती होणार आहे. त्या जागांची भरती यामध्ये माहिती यामध्ये नाही, परंतु सर्व प्रकारच्या रोजगाराची माहिती या ठिकाणी मिळणार आहे.
अमरावती येथील रोजगार मेळाव्यात अकाउंटंट या पदाची भरती होणार असून 16 ऑगस्ट पर्यंत हा ऑनलाईन इंटरव्यू आणि रोजगार मेळावा राहणार आहे. हा मेळावा देखील पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा अंतर्गत होणार आहे आणि तो ऑनलाइन असून वरती दिलेल्या सरकारी संकेतस्थळावर संपर्क साधावा.