बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेची संबंधित केंद्र शासनाच्या धर्तीवरील राज्य सरकारचे पुरस्कार काल जाहीर करण्यात आले त्यामध्ये निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्या संस्था विद्यापीठ आणि स्वयंसेवक व प्राध्यापकांचा यामध्ये गौरव करण्यात आला आहे.
यामध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट दुसऱ्या क्रमांकाचे महाविद्यालय म्हणून अनेकांत एज्युकेशन सोसायटी च्या तुळजाराम चतुरचंद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा झेंडा रोवला गेला आहे, तर राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून याच महाविद्यालयाचे डॉ. विलास कर्डिले यांना गौरवण्यात आले आहे. तर राज्यातील सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी चा राजश्री लक्ष्मणराव माने हिला गौरविण्यात आले आहे.
राज्य शासनाने काल हे पुरस्कार जाहीर केले. यामध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार म्हणून गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठास तर सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून याच विद्यापीठाचे डॉ. नरेश मधुकर मडावी यांना जाहीर केला आहे
तर सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कारांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कांदेवली चा प्रथम क्रमांक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा द्वितीय; गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या चंद्रपूर येथील श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा याचा तिसरा क्रमांक तर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयाचा चौथा क्रमांक आला आहे.
सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्याचा पुरस्कार कांदिवली चा ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सुशील राम शिंदे बारामतीच्या अनेकांत एज्युकेशन सोसायटी च्या तुळजाराम चतुरचंद कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे डॉक्टर विलास वसंतराव कर्डिले राजूरा चंद्रपूर येथील श्री शिवाजी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे गुरुदास दादाजी बल्की लातूरच्या राजश्री शाहू महाविद्यालयाचे डॉक्टर कल्याण धोंडीबा सावंत यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्रात वाशिम च्या श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा या महाविद्यालयाचे डॉक्टर योगेश मधुकरराव पोहकर; सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय रहिमतपूर सातारा येथील डॉक्टर शरयू हनुमंतराव भोसले; राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या लोणी येथील कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रवीण सुखदेव गायकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रमाता इंदिरा गांधी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय जालना या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. स्वामीनाथ सारंगधर खाडे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सर्वोत्कृष्ट स्वयंसेवकांचा पुरस्कार
यामध्ये बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्या राजश्री लक्ष्मणराव माने; नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या दिवेश नंदकिशोर गिन्नारे; नंदुरबार येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या प्रतीक माधव कदम; परभणीच्या कृषी महाविद्यालयातील सिद्धी भारत देसाई; अमरावतीच्या श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयातील अमर अनिल कातोरे; नांदेड येथील सामाजिक शास्त्रे संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अमोल उद्धवराव सरोदे; मुंबई चर्चगेट येथील केसी महाविद्यालयाच्या शिवम आशिष पटेल; दापोली कृषी महाविद्यालयातील रवींद्र ताराचंद पाटील; टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रसाद गोरखनाथ वाघमोडे;
पुणे कृषी महाविद्यालयातील अनिकेत रवींद्र वाकळे; औरंगाबादच्या सिल्लोड येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील तेजस्विनी कैलास शेठ वानखेडे; सोलापूर येथील वेलणकर वाणिज्य महाविद्यालयाच्या समर्थ मधुकर चिवरे; साताऱ्यातील दहिवडी महाविद्यालयातील अनिकेत उद्धव वाघमारे व गडचिरोली येथील महात्मा गांधी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आरमोरी येथील प्रियांका शामराव ठाकरे या विद्यार्थ्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.