स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत केंद्र सरकारच्या पोलिस कॉन्स्टेबल पदी काम करण्याची संधी, तब्बल २५ हजार २७१ जागांची होणार भरती
महान्यूज करिअर अपडेट
पोलिस म्हणून सेवा बजवायची आहे, त्यातही केंद्र सरकारच्या सेवेत राहायची इच्छा आहे? तर लगेच तयारी करा.. कॉन्स्टेबल म्हणून देशात कोठेही काम करण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. तब्बल २५ हजार २७१ जागांची ही भरती होणार आहे.
दहावी उत्तीर्णांसाठी ही संधी असून ३१ ऑगस्ट पर्यंत याकरीता अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे, याकरीता ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवाराची वयोमर्यादा ही किमान १८ व कमाल २३ वर्षे असावी. शासन नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सवलत राहणार आहे. २१ हजार ७०० रुपये ते ६९ हजार १०० ही वेतनश्रेणी यासाठी लागू असणार आहे.
याकरीता अर्ज करण्यासाठी खुल्या व ओबीसी प्रवर्गासाठी १०० रुपये शुल्क असून अनुसूचित जाती, जमाती व अपंग उमेदवारांना परीक्षा शुल्क नाही. या भरती प्रक्रियेत पाच टप्पे राहणार आहेत. संगणक आधारीत चाचणी, शारीरीक क्षमता चाचणी, मैदानी चाचणी, वैद्यकीय चाचणी व कागदपत्रे पडताळणी याद्वारे ही भरती होणार आहे.
शारीरीक मैदानी चाचणीत पुरूषांसाठी २४ मिनीटांत ५ किलोमीटर व साडेसहा मिनीटांत १.६ किलोमीटर अंतर पूर्ण करायचे असून महिलांसाठी १.६ किलोमीटर अंतर साडेआठ मिनीटांच्या आत व ८०० मीटर ४ मिनीटांत पूर्ण करायचे आहे.
परीक्षेत सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी, गणित व इंग्रजी अथवा हिंदी असे चार विषय असून त्या प्रत्येकाला २५ प्रश्न व २५ गुण असणार आहेत. ९० मिनीटांची ही सर्व चाचणी असणार आहे.
या पदासाठी खुल्या गटातील पुरूषाची उंची १७० तर महिलेची उंची १५७ सेमी असावी. मराठा उमेदवारांसाठी उंची १६५ सेमी तर महिलांसाठी १५५ सेमी असावी. सप्न अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी पुरूषांकरीता १६२.५ सेमी तर महिलांसाठी १४० सेमी असावी.
यासाठी पश्चिम विभागातील परीक्षा केंद्रे जाहीर करण्यात आली असून यामध्ये Regional Director (WR), Staff Selection commission, 1st Floor, South Wing, Pratishtha Bhawan, 101, Maharshi Karve Road, Mumbai, Maharashtra-400020 (www.sscwr.net) हे विभागीय केंद्र आहे. तर राज्यातील औरंगाबाद, जळगाव, मुंबई, पुणे, नांदेड, नागपूर, कोल्हापूर, नाशिक या जिल्हा केंद्रांचा समावेश आहे.
यातील अधिक व सविस्तर माहितीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या http://www.ssc.nic.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. ही भरती सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, इंडो टिबेटियन सीमा सुरक्षा दल, सचिवालय सुरक्षा दल, आसाम रायफल्स, सशस्त्र सीमा दल, कॉन्स्टेबल ( जनरल ड्युटी) यांच्यासाठी होणार आहे. अधिक व सविस्तर माहितीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनचे https://www.ssc.nic.in/ हे संकेतस्थळ अथवा http://www.crpf.gov.in/ हे सीआरपीएफचे संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी.