माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. १२ – पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाने समाविष्ठ 814 गावांचा विकास आराखडा प्रसिध्द झाला असुन भोर तालुक्यातील समाविष्ट 53 गावांमधील रस्त्यांसह सार्वजनीक सेवा सुविधांसाठीचे जमिनीवरील आरक्षण जाहीर केले आहे. नसरापूरचा देखील ग्रोथ सेंटरमध्ये समावेश केल्याने सुपीक जमीनसह अनेकांना बेघर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने याला स्थानिकांचा कडाडून विरोध होत आहे.
पीएमआरडीने 2 आँगस्ट रोजी प्रसिध्द केलेल्या या विकास आरखड्यात भोर तालुक्यातील 53 गावांचा समावेश असुन या मधील भविष्यात नगरपंचायत म्हणुन विकास होणारे नसरापूर हे मोठे गाव ग्रोथ सेंटर म्हणुन जाहीर केले असुन या ठिकाणी हाँस्पिटल, शाळा, क्रिडांगण, बाग, अग्निशमन केंद्र तसेच परिसरातील सात ते आठ गावांना जोडणारे रस्ते आदी सेवासांठी शेत जमिनींवर आरक्षण टाकण्यात आले आहे. या आरक्षित केलेल्या जमिनीमध्ये अनेक नागरीक बेघर व भुमिहीन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आराखड्यात नसरापूरमधील शेती झोन पुर्ण काढला असुन शेतीऐवजी टुरिझम विकास झोन या शिवाय औद्योगिक, व्यापारी, रहिवास झोन टाकण्यात आले आहे. भविष्यातील शहरीकरण व लोकसंख्या वाढीचा अंदाज धरुन नसरापूरसह परिसरातली सात ते आठ गावांसाठी नसरापूर ग्रोथ सेंटर ची संकल्पना ठेऊन मुख्य रस्त्याचे रुंदीकरण काही भाग 24 मिटर,काही भाग 18 मिटर, तर मुख्य गावठाणात 9 मिटर रुंदीकरण ठरवण्यात आले आहे या शिवाय केळवडे पाणंद पासुन चांदणी महल मार्गे नसरापूर मध्ये 30 मिटर रस्ता कामथडी अलीकडे जंक्शन साठी होणार आहे.
वनविहार सोसायटीला लागुन महामार्गा पासुन सरळ खाली माळेगाव पर्यंत 30 मिटर रुंदीचा रस्ता होणार आहे हा रस्ता नसरापूर गावठाणाला पर्यायी रस्ता होऊ शकणार आहे,या बरोबरच चेलाडी नसरापूर रस्त्यावर डाव्या बाजुला बनेश्वर पँराडाईज सोसायटी ला लागुन 18 मिटर रस्ता तसेच चेलाडी येथुन देखिल उजव्या बाजुस वनविहार सोसायटीकडे देखिल 18 मीटरचा रस्ता होणार आहे.या शिवाय क्रिंडागण, अग्निशमन केंद्र आदींसाठी आरक्षण टाकण्यात आले आहे.
आराखडा प्रसिध्द झाल्यापासुन समाविष्ट गावामधील नागरीक गावच्या विकास आराखडा नकाशाची ऑनलाईन पाहणी करुन आपली जमीन यामध्ये जात आहे काय याची खात्री करत आहेत ज्यांची शेतजमिन जात आहे त्यांनी तसेच ज्यांचे संपुर्ण घर तर काहींची संपुर्ण जमिन जात आहे ते हवालदिल झाले आहेत व त्यांनी हरकतीची तयारी केली आहे.याबाबत हरकती 30 आँगस्ट पर्यंत प्राधिकरणाच्या औँध पुणे येथील कार्यालयात स्विकारल्या जाणार असुन 30 सप्टेंबरपर्यंत त्यावर सुनावणी होणार आहे.
नसरापूर येथील रविंद्र शेडगे, हनुमंत कदम, गणेश कदम, दिलीप दळवी, उन्नीकृष्णन आय्यर यांच्यासह अनेक नागरीकांचे मोठे नुकसान होत असुन त्यांनी या बाबत हरकत घेण्यास सुरुवात केली आहे. पीएमआरडीएचे नियोजन व्यवस्थापक अभिराज गिरकर यांनी याबाबत माहीती दिली कि, आराखड्यासाठी 2017-18 मध्ये सर्व्हे करण्यात आला असून शक्यतो मोकळ्या शेत जमिनींवर आरक्षण टाकण्यात आले आहे. काही ठिकाणी बांधकामे येत असून ती विनापरवाना आहेत. तसेच हा प्राथमिक आराखडा आहे. हरकती मागवण्यात आल्या असून सुनावणीनंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल.