महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
‘माणसांची हाणामारी झाल्यावर ज्याच्या विरोधात कंप्लिट केली आहे, त्याला तुम्ही धरून आणता की नाही? मग खेकडे मला झोंबलेत, चाललेत, तुम्ही पहिले खेकड्याने धरून आणा’.. बेवड्याची ही तक्रार ऐकल्यानंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील पोट धरून हसाल सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ फारच वायरल होताना दिसत आहे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
याचा व्हिडीओ येथे पाहू शकता अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर होऊ शकता
सोशल मीडियावर सध्या व्हिडिओ व्हायरल होत असून पोलिसांचे काम काही आता अगदी साधासुधं राहिलेले नाही, अशा स्वरूपाच्या टॅगलाईनने हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने वायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये एक दारू पिलेला इसम पोलिसांच्या समोर बसलेला आहे आणि तो पोलिसांना मी ओढ्याला खेकडे पकडायला गेलो, तेव्हा ओढ्यातील खेकडे मला झोंबलेले आहेत, माझ्या हाता पायाला चावलेले आहेत असे तो सांगताना दिसतो.
त्यावर पोलिस त्याला सुरुवातीला कुठे कुठे जखमा झाल्या आहेत असे विचारताना दिसत आहेत. तर तो असा हात वगैरे दाखवतो, परंतु त्यानंतर पोलिस त्याला गमतीने विचारतात की, खेकड्यांकडे तुम्ही गेला होतात, खेकडे तुमच्याकडे आले नव्हते.. मग खरं तर खेकड्यांची कंप्लेंट घ्यायला पाहिजे.. त्यावर तो गांगरतो.
तो इसम अभावितपणे सांगतो की, साहेब हे बघा.. आम्ही गेलो होतो.. ओढ्यामध्ये खेकडे धरायला; पण त्यांनी मला काय झोंबायची गरज होती का? आता तुम्ही माणसांना धरून आणता की नाही? मग तुम्ही खेकड्याना धरून आणा!
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा खरंच पोलिस ठाण्यातून घेतला की पोलीस आहेत असे सांगून दुसऱ्या कोणा समोर बसून त्याला हे प्रश्न विचारत व्हिडिओ घेतला? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या व्हिडीओची पुष्टी देखील झाली नाही, मात्र हा व्हिडिओ कोकण, कोल्हापूर किंवा नगर जिल्ह्यातील भागातील असावा असे बोलले जात आहे.