दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील धावडी गावात एका २५
वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या
केल्याची घटना घडली आहे. याची तक्रार चुलते
भीमराव शिवाजी घाडगे यांनी वाई पोलिस ठाण्यात दिली आहे .
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धावडी (ता.वाई) येथील रहिवासी असलेले समीर अशोक
घाडगे (वय २५ वर्ष) याने आत्महत्या केली.
येथील ऊठाचा डोह नावाच्या शिवारातील शेतामधील करंजाच्या झाडाला नॉयलोनच्या दरीच्या साह्याने १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूचे नेमके कारण समजु शकले नाही. याचा अधीक तपास वाई पोलीस करीत आहेत.