खंडाळा : महान्यूज लाईव्ह
उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत 27 जुलै रोजी सकाळी आठ वाजता एक अपघात झाला होता. या अपघातात उंब्रज येथील अनिकेत तानाजी कोळी या 23 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर वाहन न थांबता निघून गेले. त्यावरून पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले.
उंब्रज पोलिसांनी केलेल्या तपासाचे कौतुक केले जात असून, उंब्रज पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व सायबर विभागाची मदत घेतली आणि या वाहनाचा शोध घेतला. यामध्ये खाजगी ट्रॅव्हल कंपनीचे हे वाहन होते. जी.जे. 5 बी.व्ही 94 39 या क्रमांकाची ही बस पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोधली.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव येथून हनुमंत दिनकर कदम या संशयित आरोपीस ताब्यात घेतली घेतले आणि 10 ऑक्टोबर रोजी त्याला अटक केले. ही कामगिरी सहाय्यक निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मोहन तलवार, पोलीस नाईक आसिफ जमादार, सचिन देशमुख, वैभव यादव, निलेश पवार आदींनी केली. पुढील तपास फौजदार मोहन तलवार करत आहेत.