बारामती : महान्यूज लाईव्ह
येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील बी बी ए (सी ए) विभागातील विद्यार्थिनी प्राप्ति पांडुरंग बागल हीने एप्रिल-मे 2020 या शैक्षणिक वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये 87.58% गुण मिळून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक पटकावला.
विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, डॉ. राजीव शहा व संस्थेचे रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी प्राप्ती बागल हीचे हार्दिक अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ शामराव घाडगे, विभाग प्रमुख प्रा.महेश पवार ,प्रा.विशाल शिंदे प्रा.अनिल काळोखे, प्रा. कांचन खिरे, प्रा.अक्षय शिंदे तसेच इतर शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.











