बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची मागील तीन दिवसांपासून तब्येत ठीक नव्हती. मात्र त्यांच्या सर्व चाचण्या नॉर्मल आल्या असून आजचा दिवस ते विश्रांती घेणार आहेत.
स्वतः रोहित पवार यांनी आज ट्विट करून ही माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आजच्या दिवस विश्रांती घेणार असून मंगळवारपासून सर्वांच्या भेटीसाठी ते उपलब्ध असतील.
https://twitter.com/RohitPawarSpeak/status/1424587279150960644?s=19
दरम्यान मागील तीन दिवसात अनेकांचे फोन घेता आले नाहीत आणि नियोजित भेटी होऊ शकले नाहीत त्याबद्दल त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे.











