दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी वाई येथे सुरू करण्यात आलेल्या महालंगर मार्फत आज सलग पाचव्या दिवशी भोजन व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.
श्रीनिवास पाटील फाउंडेशन व सेंट उर्सुला हायस्कूल (पिंपरी-चिंचवड,पुणे) व अन्य सहयोगी संस्थांच्या सहकार्यातून, तसेच गुरुद्वारा श्री गुरू सिंग सभा (पुणे) यांच्या मदतीने वाई येथे १० ऑगस्टपासून सुरू असलेल्या महालंगरातून अन्नदान व मदतकार्य सुरू आहे.
आज भोजन पॅकेट्स, किराणा माल व जीवनावश्यक साहित्याचे किट वाहनातून तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिवृष्टीग्रस्त गोळेगाव, गोळेवाडी गावात वितरित करण्यात आले.
यावेळी श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील उपाध्यक्षा रचना पाटील, सेंट उर्सुला कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका व शिक्षिका, अँड. नीलेश डेरे, पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते समीर पंजाबी, सर्वेश जाधव, कृणाल घोडके व फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते.











