Featured

च्यामारी… पहिल्यांदाच असं घडलं.. शेतात शेतमालाचं पिक घेतात, पण त्यांनी घेतले बनावट नोटांचं पिक…! वर्षभर वावरातच छापत होते नोटा..!

युवराज जाधव, महान्यूज लाईव्ह

सांगली – एकतर गेल्या दोन वर्षांपास्न वावरात जे पिकतंय, ते विकत नाही.. जे विकतंय ते नेमकं काय आणि कधी विकतंय ते आम्हास्नी काही कळेना झालंय.. आणि तिकडं ते कोल्हापूरात थेट वावरात नोटा पिकवित होते.. च्यामारी.. त्या नोटा बनावट आहेत, हे कळायला, पोलिसांस्नी देखील एक वर्ष लागला..#fake #curency #kolhapur #crime

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी येथे उत्तम पवार व अनिल हळदकर हे दोघे शेतात दोन हजार आणि पाचशेच्या नोटा छापत होते. फक्त छापत नव्हते, तर वर्षभर ते विविध ठिकाणी छापलेल्या नोटा खपवत होते. पोलिसांनी त्यांना अटक केली, तेव्हा परीसरातील अनेकांना मोठा धक्का बसला.

पालकरवाडी येथे उत्तम पवार याची शेती आहे. या शेतातच बनावट नोटा छापल्या जात होत्या. थोडक्यात पवार याने उत्तम पणे उत्पादन घ्यायचे आणि या नोटांचे मार्केटींग म्हणजे यशस्वीरित्या खपविण्याचे काम हळदकर याच्याकडे होते.

वर्षभरापासून ते हा धंदा अगदी बिनदिक्कतपणे करीत होते. मात्र चार दिवसांपूर्वी त्यांचा पापाचा घडा भरला. चार दिवसांपूर्वी हळदकर हा कोल्हापूरातील राजारामपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दोन हजारांच्या नोटा घेऊन गेला. त्यातील ६७ नोटा त्याने जमा केल्या. कॅशियरने त्या नोटा देखील जमा करून घेतल्या.
मात्र जेव्हा या नोटा कॅशिअरने नंतर एका खातेदाराला दिल्या, तेव्हा खातेदाराने एकाच क्रमांकाच्या १७ नोटा कशा म्हणून त्याला आलेली शंका त्याने कॅशिअरला बोलून दाखवली. आणि कॅशिअरच्या डोळ्यापुढे काजवेच चमकले.

कॅशियरने या नोटा कोणी भरल्या याची चाचपणी केली, तेव्हा हळदकर हा नोटा देऊन गेला होता. कॅशिअरने लगेचच राजारामपुरी पोलिस ठाण्यात संपर्क साधून याची माहिती दिली.

राजारामपुरी पोलिसांनी गांभिर्य लक्षात घेऊन हळदकर याला गाठले. त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली, तेव्हा पालकरवाडीचे नाव पुढे आले. पोलिसांनी पालकरवाडी गाठली., तेव्हा तिथे बनावट नोटा छापण्याची यंत्रसामग्री आढळून आली. तेथे बनावट नोटा छपाई यंत्र, कागद, प्रिंटर पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सिताराम डुबल व दीपिका जोगळे यांनी केली.

Maha News Live

Recent Posts

इंदापूरमध्ये घड्याळाचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत? पैशावरून राडा!

इंदापूर : महान्यूज लाईव्ह  महायुतीचा प्रचार करण्यासाठी आणलेल्या महिलांना पैसे दिले नाहीत, म्हणून महिलांनी इंदापूरात…

21 hours ago

मोदीसाहेब, तुमचा टेलीप्रॉम्टर तपासा… खरंच सांगा शेतकऱ्यांना दिलासा कोणी दिला?

बारामती : महान्यूज लाईव्ह गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक सभा वाढवल्या. या…

2 days ago