अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
पुरंदर तालुक्यातील सासवड नजिकच्या खळद येथे सेंट जोसेफ ही कॉन्व्हेन्ट शाळा आहे. काल मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तींनी शाळेतील सेंट मेरीच्या पुतळ्याची तोडफोड केली आणि तेथून शाळेतील नन राहत असलेल्या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला.
याबद्दल वानवडी येथील फादर माल्कम सेक्वेरिया, केविन मन्युल, रोहन गायकवाड, नेल्सन पिंटो यांनी सदर ठिकाणी भेट दिली आणि सदर घटनेचा तीव्र शब्दामधे निषेध केला.
अशा असामाजिक तत्वांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी केविन मॅन्युअल यांनी केली . याबाबत पुरंदर हवेली चे आमदार संजय जगताप यांनाही याबद्दल सांगितले असता त्यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली.
जगताप यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी चर्चा करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि तेथील कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याबद्दल पोलिसांना सूचना देण्यात आल्या.