पुणे : महान्यूज लाईव्ह
जिथे वरमाईच शिंदळ असते, तिथे वऱ्हाडाला नावे ठेवून काय उपयोग? दोन दिवसांपूर्वी पुण्यातील उपायुक्त महिलेला फुकटच्या बिर्याणीच्या प्रकरणावरून संपूर्ण राज्याने झोडले असतानादेखील पोलीस सुधारायला तयार नाहीत. आज बारामतीत तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे याला 1 लाख 10 हजार रुपयांची लाच घेताना लाच पुणे लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. लाचेच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दादासाहेब ठोंबरे (वय -50) असे पकडण्यात आलेेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे नाव मारहाण प्रकरणातून नाव कमी करण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता मदत करण्यासाठी म्हणून दादासाहेब ठोंबरे याने 1 लाख 80 हजार रुपयांची पाच मागितली होती. तडजोडीअंती 1 लाख 10 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.
चक्क बारामतीतील पोलीस हवालदाराला लाच घेताना पकडले आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.