दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : मतदारसंघातील शहरी भागातील आवश्यक कामांना गती मिळावी व नागरिकांच्या समस्या तातडीने दुर व्हाव्यात यासाठी राज्य शासनाच्या नगरपरिषदांना वैशिष्टयपुर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत वाई, खंडाळा, पाचगणी व महाबळेश्वर नगरपालिकेच्या विकासकामाकरिता रुपये 7 कोटी मंजुर झाले असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.
यावेळी ते म्हणाले की, वाई नगरपरिषद हद्दीतील ब्रिटिशकालीन दगडी कमानीचा पुल हा शहरातील मुख्य मार्गावरील महत्वाचा पुल असून या पुलावरुन मोठया प्रमाणात वहातुक होत असते. या पुलास 100 वर्षापेक्षा जास्त वर्षे झाली असल्याने हा पुल धोकादायक झाला असल्याने या पुलाच्या नवीन बांधकामासाठी यापुर्वी 13 कोटी निधी उपलब्ध झाला आहे.
या पुलाचे स्टक्चरवर आकर्षक दगडाचे क्लँडीग करणे आवशक असल्याने याकामासाठी जादा खर्च 2 कोटी येणार असल्याने याकामासाठी शासनाकडून 2 कोटी मंजुर केले असल्याने आता या पुलासाठी 15 कोटी निधी उपलब्ध झाला आहे.
पाचगणी हे जागतिक पर्यटन केंद्र असल्याने येथील मुख्य बाजारपेठेतील टेबललँन्ड ते छ. शिवाजी महाराज पुतळा चौकापर्यंत दुतर्फा आर.सी.सी. बंदिस्त गटर करणे आवश्यक असल्याने यामाकासाठी रुपये 2 कोटी 56 लाख मंजुर झाले आहेत.
महाबळेश्वर नगरपरिषद क्षेत्रामध्ये महिलांसाठी योगा हॉल, अंडरग्राऊंड केबल, स्ट्रीट लाईट पोल बसविणे, संरक्षक भिंत दुरुस्ती, रस्ते कॉक्रीटीकरण, गटर दुरुस्ती या कामासाठी 1 कोटी 89 लाख मंजुर झाले आहे.
मंजुर कामे पुढीलप्रमाणे :- वाई नगरपरिषद :-1) वाई शहरातील कृष्णा नदीवरील ब्रिटीश कालीन जुना पुल पाडुन नवीन पुल बांधणे वाढीव कामासाठी 2 कोटी, प्रभाग क्रं.8 सिध्दनाथवाडी येथील प्रकाश खरात मिळकत ते अनिल सुतार मिळकत ते जयवंत कचरे मिळकतीपर्यंत आर. सी. सी. गटर दुरुस्ती 34 लाख रुपये,
खंडाळा नगरपंचायत : खंडाळा नगरपरिषद अंतर्गत पिण्याची विहीर जवळील रस्ता कॉक्रीटीकरण व गटर 20 लाख रुपये.
पाचगणी नगरपरिषद : पाचगणी नगरपरिषद अंतर्गत टेबललॅन्ड ते छ.शिवाजी महाराज पुतळा चौकापर्यंत दुतर्फा आर.सी.सी बंदिस्त गटर दुरुस्ती 2 कोटी 56 लाख रुपये.
महाबळेश्वर नगरपरिषद :-1.महाबळेश्वर रांजणवाडी इदगाह मैदान परिसर मजल्याचे काम 1.0.50 लाख, 2) महिलांसाठी योगा हॉल बांधणे 15 लाख, 3)श्री.राधाकृष्ण् मंदिर पहिल्या मजल्याचे बांधकाम 15 लाख रुपये. 4) श्री. गुरुदेवदत्त हौसिंग सोसायटी, जन्नीमाता सोसायटी व गणेशनगर अंडरग्राऊंड केबल, गणेश विर्सजन विहीर दुरुस्ती 11 लाख,
5) मस्जिद रोड येथील हॉटेल रमा चौक अंडरग्राऊंड वायरिग व हायमास्ट बसविणे 10 लाख 6) माखरिया गार्डन शेजारी पंपिंग स्टेशन रुम दुरुस्ती ,पडवी करणे वायरिग करणे.10.50 लाख,7) श्री.जन्नीमाता मंदिर माळी आळी महाड रोड येथे डी.पी.बसविणे व रस्त्यालगत संरक्षक भिंत दुरुस्त 10.50 लाख.
8)चर्मकार समाजविहीर दुरुस्त करणे व परिसर सुशोभिकरण 10.20 लाख,9)गवळी मोहल्ला अंतर्गत बोळांना कॉक्रीटीकरण 10.50 लाख,10) शाळा क्रं.1 समोरील सार्वजनिक विहीर ते फॉरेस्ट ऑफिस ते पार्सेनेज मार्केट विहीर दुरुस्त ,गटर बांधणे,मोरी बांधणे 15 लाख.
11)डॉ.साबणे रोड लगत खाटिक गल्ली येथील सार्वजनिक बोळ कॉक्रीटीकरण व शौचालय दुरुस्ती 10.15 लाख,12)स्कुल मोहल्ला अंतर्गत 5 गल्ली कॉक्रीट करणे.10.50 लाख, 13) श्री. अंबिका नामदेव सोसायटी येथील समाजमंदिर दुरुस्ती 10 लाख. 14) प्रभाग क्रं.8 मध्ये विविध ठिकाणी स्ट्रीट लाईट पोल 10.15 लाख.
15) नगरपरिष्द शाळा क्रं.2 पैकी एम. ई.एस. शाळा परिसर दुरुस्ती 10 लाख. 16) मरी पेठ हिमालया आईस फॅक्टरी ते फॉरेस्ट ऑफीस गटर दुरुस्ती स्ट्रीट लाईट काम 10 लाख, 17)प्रभाग क्रं.5 अंडर ग्राऊंड केबल टाकणे व गटर दुरुस्त 10.20 लाख.
वाई नगर परिषद शाळेच्या नवीन इमारतीसाठी चार कोटी!
वाई नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळा क्रं.1 या शाळेची इमारत जुनी असल्याने शाळेतील मुलांना धोका होऊ नये यासाठी नवीन इमारतीच्या बांधकामासाठी नगरपरिष्दांना सहाय्यक अनुदान व कर्जे अंतर्गत रुपये 4 कोटी 6 लाख मंजुर झाले असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.











