महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
आसाम पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर आसामचे पाच पोलीस शहीद झाल्यानंतर पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर हे गंभीर जखमी झाले होते मात्र मिझोराम पोलिसांनी आता चोराच्या उलट्या बोंबा मारत थेट आसामच्या मुख्यमंत्री या विरोधात गुन्हा दाखल केला असून या चर्चेचे पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर यांच्यावर देखील खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणावरून आसामने देखील मिझोरामच्या कोलासिब जिल्ह्यातील सहा अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली असून मिझोरामचे राज्यसभेचे खासदार के. वनलेवना यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
मिझोराम सरकारने मुख्यमंत्री हेमंता बिस्वस शर्मा, आसामचे पोलीस महानिरीक्षक अनुराग अग्रवाल, पोलीस उपमहानिरीक्षक देव ज्योती मुखर्जी, विभागीय वन अधिकारी सुञ देव चौधरी, पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर, उपायुक्त कीर्ती जल्ली व डोलाई पोलीस स्थानकाचे अंमलदार साहेबउद्दीन यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे आसामने देखील मिझोराम प्रशासनाने सीमेवरील सामान्य नागरिकांना शस्त्रास्त्रे दिल्याचा आरोप केला आहे. हे सर्व नागरिक पूर्वाश्रमीचे अतिरेकी असून ते प्रशिक्षित असल्याने आक्रमकपणे ते कृती करत आहेत, त्यांना थांबावे लागेल असे चचरच्या उपायुक्त कीर्ती जल्ली यांनी स्पष्टीकरण दिले आहे.











