खंडाळा महान्यूज लाईव्ह
पिसाळवाडी (ता.खंडाळा) गावच्या हद्दीमध्ये उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून मोटारसायकलने दिलेल्या धडकेत दुचाकीचालक सर्जेराव आबाजी मोटे (वय 55) हे जागीच ठार झाले, तर मोटारसायकलच्या पाठीमागे बसलेला संतोष चंद्रकांत मोटे (वय 45, दोघे रा.धनगरवाडी ता.खंडाळा ) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबतची पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,लोणंद-शिरवळ रस्त्यावर मालवाहतूक करणारे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे पिसाळवाडी (ता. खंडाळा) हद्दीमध्ये एका हॉटेलसमोर मोठ्या प्रमाणात वाहतूक करणारी वाहने गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर, सांगली याठिकाणी जाणेकरीता महापूर आल्याने शिरवळ पोलीसांनी वाहतूक पंढरपूर फाट्यामार्गे वळविल्याने थांबलेली आहेत.
दरम्यान,25 जूलै रोजी राञी 10 वाजण्याच्या सुमारास हाँटेललसमोर महामार्गालगत थांबलेल्या मालट्रक (क्रं.टीएन-28-बीसी-7360) ला शिरवळ बाजूकडून लोणंद बाजूकडे भरधाव वेगाने निघालेल्या दुचाकी (क्रं- एमएच-11-बीबी-3251) ने जोरदार पाठीमागून धडक दिली.
ही धडक एवढी भीषण होती की, धडकेनंतर दुचाकीचालक सर्जेराव आबाजी मोटे (वय 55) हे जागीच ठार झाले तर दुचाकीवर पाठीमागे बसलेले संतोष चंद्रकांत मोटे (वय 45,दोघे रा.धनगरवाडी ता.खंडाळा ) हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या संतोष मोटे यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून सर्जेराव मोटे यांना डाँकटरांनी तपासून मृत घोषित केले आहे.
या घटनेची फिर्याद सागर पिसाळ यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार धिरज यादव हे करीत आहेत.











