माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर – सांगली, कोल्हापूर, चिपळूणमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे – सातारा महामार्गावर अडकलेल्या ट्रकचालक आणि किन्नरांना नसरापूर येथील सिध्दीविनायक प्रतिष्ठान व शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने अल्पोपहार देऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
सिध्दीविनायक प्रतिष्ठान आणि शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या नसरापूर ( ता. भोर ) वतीने संयुक्त उपक्रम राबविण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र डिंबळे यांच्या मार्गदर्शन खाली महामार्गावरील जवळपास दोनशे चालक आणि वाहक यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना गोळ्या आणि औषध वाटप करण्यात आले. तसेच चालक आणि वाहकांना बिस्कीट पुडे, पोहे, पाणी बॉटल, अल्पोपहार वाटप करण्यात आले.
यावेळी सिध्दीविनायक हॉस्पिटलचे डॉ. जगदीश फरांदे, मंगेश सरपले, तेजस भगत, रेश्मा गव्हाणे, शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रज्योत कदम, उपाध्यक्ष सूरज भगत, प्रतीक कोंढाळकर, ओंकार चोरघे, निलेश वाल्हेकर, विशाल राजेशिर्के, सुनील जामदार, कुणाल भगत, सौरभ शेटे, दिनेश शिंदे, मारुती मरगळे, अक्षय कदम, आनंद खुडे, दत्तात्रय आखाडे, निखिल भंडारी, नवनाथ कचरे, निखिल पवार, सूरज धोत्रे, विशाल शिंदे, अनिल आखाडे, आदित्य पवार उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र डिंबळे यांनी माहिती देताना सांगितले की, सिध्दीविनायक प्रतिष्ठान वेळोवेळी आरोग्य शिबिर घेऊन रुग्णांवर मोफत उपचार घेऊन विधायक काम करत असून अडलेल्या वाटसरूंना मदत सर्वांनी करावी असे आवाहन त्यांनी केले. तर शिवसाम्राज्य प्रतिष्ठान नेहमी सामाजिक आणि विधायक कार्य करत असल्याची माहिती प्रज्योत कदम आणि सूरज भगत यांनी यावेळी दिली.











