बारामती : महान्यूज लाईव्ह
तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, बारामती यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्हा क्रीडा संकुल व बारामती तालुक्यातील क्रीडाक्षेत्रात वेगवेगळ्या खेळांचे मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा क्रीडा संकुल समिती सदस्य अविनाश लगड, शारीरिक शिक्षक महासंघाचे राज्याचे अध्यक्ष शरद धारूरकर, उपाध्यक्ष मिलिंद क्षीरसागर, बारामती बिल्डर्स असोसिएशनचे दीपक काटे, लॉन टेनिस असोसिएशनचे सचिव दत्तात्रेय बोराडे, बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय संघवी विनायक साखरे, बारामती तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे या मान्यवरांच्या शुभहस्ते बारामती तालुक्यातील विविध क्रीडा प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये कबड्डी – दादासो आव्हाड, मोहन कचरे, दत्तात्रय चव्हाण, व्हॉलीबॉल – शिवाजी जाधव बॉक्सिंग – अमर भांडलकर, हिम्मत कौले, लॉन टेनिस- प्रदीप कुंचुर, दत्तात्रय बोराडे, कराटे -रविंद्र करळे, अभिमन्यु इंगोले योगा -महाजन सर बॅडमिंटन – गणेश सपकाळ, तनुजा सपकाळ, जिम ट्रेनर अनिल जगताप, विद्या प्रबोधिनी करिअर अकॅडमी घाडगे, संजय होळकर, प्राध्यापक लक्ष्मण मिटकरी, प्राध्यापक अशोक देवकर, अनिल गावडे, दादासाहेब शिंदे, सचिन नाळे, दीपक नलावडे, प्रसाद रणवरे, सुभाष चव्हाण अभि चव्हाण, प्रेमकुमार धर्माधिकारी ( पत्रकार ) इत्यादींचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद क्षीरसागर यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व तर शरद धारूरकर यांनी बारामतीतील क्रीडा क्षेत्रातील यशस्वी घोडदौड याविषयी माहिती दिली. संभाजी होळकर यांनी बारामती तालुक्यातील वेगवेगळ्या शाळांमधील क्रीडाक्षेत्राचा आढावा घेतला व क्रीडा क्षेत्रासाठी व क्रीडा विकास करण्यासाठी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार नवनवीन क्रिडांगणे व सुविधा उपलब्ध होतील अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार राजेंद्र खोमणे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचलन प्रा. अशोक देवकर यांनी केले.