संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार : शहरातील लोणार लोणी रस्त्यावर असलेल्या अकोला जनता बँकेच्या शाखेत आज रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचे दिसल्याने शहरात खळबळ उडाली या घटनेत बँकेच्या शाखेस मोठी आग लागली होती.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता
आज रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी पाहिल्यावर प्रकार उघडकीस आला. बँकेच्या शाखा कार्यालयास आत मोठ्या प्रमाणात आग लागली होती. यानंतर शहरातील नागरिक, व्यापारी येथे जमा झाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनीही तातडीने पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाठवून नगरपालिका प्रशासनालाही कळवले.
या आगीमध्ये बँके मधील संगणक व साहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कागदपत्रांचे ही मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीत नेमके नुकसान किती झाले याचा मात्र आकडा समजू शकला नाही, तसेच आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे देखील समजू शकली नाही.