• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई हैदराबाद हाय स्पीड बुलेट ट्रेन : प्रतिएकरी मोबदला मिळणार किती? पृथ्वीराज जाचक यांनी केलं आहे शेतकऱ्यांना आवाहन!

Maha News Live by Maha News Live
July 22, 2021
in सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, कामगार जगत, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह

केंद्र सरकारच्या महत्वकांशी मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन च्या सर्वेक्षणाचे काम सुरू असतानाच याला विरोधाला देखील सुरुवात झाली आहे. यामध्ये सुरुवातीला राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी उडी घेत या प्रकल्पाला विरोध केला आहे. आता त्यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला कारण ठरले आहे, जमिनीच्या मोबदल्यासह शेतकऱ्यांच्या संभाव्य फसवणुकीचे!

जाचक यांनी आज या संदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस देऊन भूमिका मांडली आहे. यामध्ये जाचक यांनी म्हटले आहे की, या ट्रेनच्या सर्व्हेचे काम सुरू असले, तरी तहसीलदार, प्रांताधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांचा यासाठी कोणताही आदेश नाही. या बुलेट ट्रेनमुळे पालखी महामार्गाप्रमाणे केंद्र शासनाकडून करोडो रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे, असे भासवले जात आहे, ते पूर्णतः चुकीचे आहे.

इंदापूर तालुक्यातील बागायती क्षेत्राची शासकीय किंमत ही प्रतीएकरी आठ ते दहा लाख रुपये इतकीच आहे. रेडी रेकनरचे दर त्याहून कमी आहेत. त्यामुळे आज जमिनीचे प्रत्यक्षात जे बाजारभाव आहेत, त्यापेक्षा अधिक मिळण्याची सुतराम शक्यता नाही असे जाचक यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय या प्रस्तावित रेल्वेमुळे या भागातील कालवे बागायती क्षेत्र व शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. प्रत्येक क्षेत्राचे गावाचे रस्त्याचे दोन दोन भाग पडतील.

या रेल्वे रुळाच्या दोन्ही कडेला भिंतीचे कुंपण असणार आहे. त्यामुळे जवळच्या शेतात जाण्यासाठी पाच ते दहा किलोमीटर अंतरावरून जावे लागेल आणि पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन व घरे जमीनदोस्त होणार आहेत. देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून जमीन मात्र तेवढीच राहिली आहे. त्यामुळे भविष्यात पैसे असले तरी जमीन परत मिळेल अशी शक्यता नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी.

या रेल्वे प्रकल्पामुळे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र सुद्धा विभागली जाणार असून त्यामुळे ऊस शेतीवर व शंभर वर्षापूर्वी मिळाल्या पाणी वाटपावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. या प्रकल्पाबाबत कोणत्याही भूलथापांना अथवा आमिषाला बळी पडू नये अशी शेतकरी कृती समितीच्या वतीने त्यांनी विनंती केली आहे.

दरम्यान यासंदर्भात जाचक यांनी काही प्रश्न उपस्थित केले असून याचे सर्वेक्षण पुणे-सोलापूर महामार्ग लगत यापूर्वी झाले होते, मग परत बागायती क्षेत्रातून सर्वेक्षण करण्याचा अट्टाहास का करण्यात आला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर देशाचा, राज्याचा विकास करत असताना पिढ्यानपिढ्या शेती करणारे शेतकरी उद्ध्वस्त करणारा विकास निश्चितच शेतीवर दूरगामी परिणाम करणारा ठरेल याची नोंद घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

या नियोजित सर्वेक्षणाबाबत सर्वच पक्षांच्या नेते मंडळींना आपण स्वतः भेटून कल्पना दिली आहे व या प्रकल्पाला त्वरित थांबवण्याची विनंती केली आहे. या प्रकल्पास पक्षीय गट विसरून सर्वांनी एकत्र विरोध करणे पुढील पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असे त्यांनी आवाहन केले आहे.

Next Post

नीरा, भिमा नदीकाठी सावधानतेचा इशारा! भिमाचा विसर्ग सुरु; तर नीरा नदीपात्रात केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते! जलसंपदा विभागाचा इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group