इंदापूर: महान्यूज लाईव्ह
इंडियन मेडिकल असोसिएशनची इंदापूर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून असोसिएशनच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी हृदयरोग तज्ञ डॉ.अविनाश पानबुडे यांची, तर सचिव पदी ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.बाळासाहेब राऊत यांची निवड करण्यात आली.
रविवारी (दि.18) रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन बैठक इंदापूर येथील नीतु मांडके आय.एम.ए. हाऊस येथे पार पडली. यावेळी इंदापूर तालुका अध्यक्षपदी डॉ. अविनाश पानबुडे, उपाध्यक्ष डॉ. अनिल शिर्के, सचिव पदी डॉ. बाळासाहेब राऊत तसेच खजिनदारपदी डॉ. महेश रुपनवर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार, इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ. संतोष खडतरे, बालरोग तज्ञ डॉ. एल. एस. कदम, डॉ. संजय देशमुख, इंदापूर तालुका मेडिकल असोसिएशन चे माजी अध्यक्ष डॉ. नामदेव गार्डे उपस्थित होते.
बैठकीस डॉ. आय एम.शिंदे, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. समीर मगर, डॉ. मनोज वाघमोडे, डॉ.अमोल रासकर, डॉ. श्रेणीक शहा, डॉ.संजय शहा, डॉ.आर. आर. शिंदे, डॉ. हेगडे, डॉ. रेणूरकर,डॉ. दीपक मोरे, डॉ. सुहास शेळके, डॉ. चंदनशिवे, डॉ.अतुल वनवे, डॉ.मंगेश पाटील, महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशन चे माजी अध्यक्ष डॉ. राम अरणकर, डॉ.ज्योती कर्सर,डॉ.बिचकुले, डॉ.खानावरे अमोल, डॉ.अनिरुद्ध गार्डे, डॉ. शिवाजी खबाले, डॉ.रोहिदास थोरवे, डॉ. सुधीर तांबिले, डॉ.अभिजीत ठोंबरे आदी उपस्थित होते.
इंदापूर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा देण्याची ग्वाही डॉ. अविनाश पानबुडे यांनी दिली.