वानवडी : महान्यूज लाईव्ह
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक पाठोपाठ आता पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पुणे दौऱ्यावर आल्यानंतर राज ठाकरे यापुढे शाखा अध्यक्षाच्या घरी जेवायला जाणं पसंत करणार आहेत, नव्हे तशी घोषणाच त्यांनी आजच्या पदाधिकारी बैठकीत करून टाकली आहे.
आगामी येणाऱ्या पुणे मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज पहिल्याच दिवशी त्यांनी मनसे नेते, शहराध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, संघटक, शाखाध्यक्ष अशा तब्बल 40 पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांना थेट लोकांमध्ये मिसळून काम करण्याचे आदेश दिले.
तसेच आजच्या पुणे शहर बैठकीत प्रभाग अध्यक्ष हे पद रद्द करून वार्डनिहाय शाखाध्यक्ष नेमण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर पुणे शहर मनसेला तब्बल 181 शाखाध्यक्ष मिळतील, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी दिली.











