महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
सोलापूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत भेट झाली आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली नसली तरी या भेटीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी बँकावरील निर्बंधाच्या संदर्भात मोदींची भेट घेतल्याची माहिती सोलापूरमधे पत्रकारांशी बोलताना पाटिल यांनी दिली आहे.
याशिवाय ईडी चंद्रकांत दादांच्या सल्ल्याने वागते हे निष्पन्न झालंय’ असंही पाटील म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे प्रदेशाध्य आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज सोलापुर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रतिक्रीया दिली आहे. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत शरद पवार यांच्या दिल्ली वारीवर प्रतिक्रिया दिली आहे. पवार-मोदी भेटी संदर्भात बोलताना बँकावरील रिझर्व्ह बँकेने लावलेले निर्बंध कमी करावेत. यासाठी शरद पवार हे दिल्लीला गेले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला आहे. ईडी ही चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्याने चालते हे अनेक वेळा निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे सरकार पाडण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील. ते हे लोकं करत असतात असा आरोपही यावेळी जयंत पाटील यांनी सोलापूर मधे केला आहे.











