सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : तालुक्यातील गुलाबनगर ( रेडा) येथून संत गुलाबबाबा पालखीची विधिवत पूजा करून हा पालखी सोहळा गुरुवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाला. कोरानामुळे हा सोहळा गेली दोन वर्ष साधेपणाने होत आहे. कोरोनाचे नियमाचे पालन करून साध्या पद्धतीने श्री संत गुलाबबाबा पालखी प्रस्थान झाले. टाळ-मृदुंगाच्या निनादात ज्ञानोबा – तुकाराम, गोपाला गोपाला च्या नाम घोषाने वातावरण भक्तीमय झाले होते. यावेळी पालखी सोहळ्याचे मानाचे अश्व सराफवाडी येथील भागवत धायगुडे, चोपदार ,विणेकरी, तुळशी वृंदावनचे मानकरी उपस्थित होते.
यावेळी येथील संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष ॲड. तानाजीराव देवकर म्हणाले की ,संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे सोळावे वर्षे असून कोरोनाच्या पादुर्भावामुळे हा पालखी सोहळा अगदी साध्या पद्धतीने सालाबादप्रमाणे प्रस्थान करत असून संत गुलाबबाबा मंदिरामध्ये पालखी सोहळा पाच दिवस मुक्काम करणार आहे. रोजच्या रोज प्रवचन, भजन मोजक्या वारकरी मंडळीच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार असून दररोज पूजा होणार आहे. आषाढी एकादशी दिवशी संत गुलाबबाबा यांच्या पादुका नीरा नरसिंहपूर संगमावरती चंद्रभागेचा जिथून उगम झाला, तिथे स्नान करून परत मंदिरामध्ये आणल्या जातील आणि गोपाळकाल्याचे किर्तन मोजक्याच वारकरी मंडळी झाल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता होईल असे ॲड.तानाजीराव देवकर यांनी सांगितले.
यावेळी रेडा गावचे सरपंच सौ.सुनिता देवकर,नानासाहेब देवकर, मच्छिंद्र पवार, धनंजय गायकवाड, संत गुलाबबाबा संस्थानचे सचिव तुकाराम जगदाळे यांनी सांगितले की, पालखी सोहळ्याचे वेळी परिसर भक्तिमय झालेला असतो. प्रत्येक जण आपापल्या घरी वारकरी भोजनासाठी घेऊन जात असतो.आपापल्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करत असतो.पण कोरोनामुळे हा आनंद गेली दोन वर्षे घेता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. संत गुलाबबाबा कर्मभूमी काटेल धाम व जन्मभूमी टाकरखेड मोरे येथून काटेल धाम संस्थान अध्यक्ष सोनूमामा भाटिया, सचिव डॉ. पुरुषोत्तम दातकर सर्व विश्वस्त मंडळ, आणि टाकरखेड येथील संत गुलाबबाबाचे वंशज ज्ञानेश्वरभाऊ उमक, गोपाल उमक सर्व विश्वस्त मंडळ,पुणे, सोलापुर, नंदुबार, नागपुर, सागर(म.प्र), रायपुर, औरगांबाद, मुंबई, अलिबाग येथील भक्तांनी दूरध्वनीवरून पालखीसोहळ्यास शुभेच्छा दिल्या
संत गुलाबबाबांचे भक्त हे महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक राज्यातून आणि जिल्ह्यातून इंदापूर तालुक्यातील संत गुलाबबाबा पालखी सोहळ्यास भक्त मंडळी येत असतात. उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी यांचीही मोठी उपस्थित असते. या कार्यक्रमासाठी निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष ॲड.तानाजीराव बाबुराव देवकर, सरपंच सौ. सुनीता देवकर, सचिव तुकाराम जगदाळे, माजी सरपंच तुकाराम देवकर, नानासाहेब देवकर, ॲड.योगेश देवकर, संतोष देवकर, शेटफळ हवेलीचे संत गुलाबबाबा भक्त मंडळ, रत्नदिप शिंदे, उमेश पाटील, दिलीप देवकर, आदिनाथ देवकर, बापु शिंदे, किसन देवकर, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पवार, धनंजय गायकवाड, हरीचंद्र देवकर, चोपदार ज्ञानदेव गोळे, बाळासाहेब कुंभार ,गणपत शिंदे, अशोक मोहिते महाराज, बापु गुरव, गणपत जाधव, जनार्दन गोसावी, ज्ञानदेव पवार, काशिनाथ देवकर, रेडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गणेश खारमाटे, कर्मचारी गणेश वाघ, महिला मंडळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.