दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस येथील टोल नाक्यावर दोन मालवाहतूक वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात जीवीत हानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.
पाटस येथील टोल नाक्यावर गुरूवारी (दि.15 ) टोल आकारण्यासाठी लेनवर थांबलेल्या मालवाहतूक ट्रकला पाठीमागून येणारा टेम्पो (छोटा हत्ती ) या वाहनाचा ब्रेक तुटल्याने वाहनावरील ताबा सुटल्याने तो टेम्पो समोर उभा असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले
आहे.
या अपघातात टेम्पोचा वाहनचालक जखमी झाला असून त्याला त्वरीत खासगी रूग्णालायत टोल नाक्याच्या रूग्णवाहिकातून हलविले आहे. ही दोन्ही वाहने सोलापूर बाजूकडून पुणे दिशेला जात होती. गुरूवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
टोल नाक्याच्या वसुली करणाऱ्या लेनवरच हा अपघात झाल्याने टोल नाक्यावरील कर्मचारांची एकच धांदल उडाली. टोल कर्मचाऱ्यांनी ही वाहने लगेच बाजुला घेऊन रस्ता मोकळा केला.











