ऋतुजा थोरात : महान्यूज लाईव्ह
भारत देशातील अनेक नागरिकांना पर्यटन आवडते. भारतीय अनेक पर्यटनस्थळे प्रसिद्ध असुन तेथील शिल्प व निसर्गरम्य वातावरणासाठी अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. भारत देशातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असेल केरळ राज्य हे सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
नविन लग्न झालेली जोडपी, कुटुंबीक सहली , तसेच शैक्षणिक सहलींसाठी देखील हे एक उत्तम ठिकाण आहे. वायनाडचे स्वत:चे आकर्षण असुन केरळ राज्यातील हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. वायनाडच्या जवळच बेंगळुरू, म्हैसूर, चेन्नई आणि कोचीसारख्या अतीशय रम्य आणि शांत वातावरणात असलेली पर्यटन स्थळे आहेत. चला तर मग जाणुन घेऊया वायनाड विषयाची माहिती..
तामिळनाडूच्या सिमेवर केरळमधील वायनाड हा जिल्हा असुन तामिळनाडू व केरळ राज्यातील अनेक पर्यटक भेटी देतात. ‘वायल’ आणि ‘नाडु’ या दोन मल्याळम शब्दापासून वायनाडचे नाव तयार झाले आहे. वायनाड येथे बारामाही नद्या वाहत असुन येथिल हवामान ही अनुकूल आहे.
वायनाड येथिल काचेचं मंदिर जगप्रसिद्ध असुन हे जैन मंदिरातील तिसरे तीर्थंकर पार्श्वनाथ स्वामी यांना समर्पित आहे. या मंदिरातील आतील भिंतीवर आरशांनी सुंदर असे कोरीवकाम केलेले आहे. भारतातील एकमेव पृथ्वी धरण हे वायनाडमधील बनसुरा सागर धरण हे आहे. आणि जवळच चंदनथोड हा एक पाईन वन आहे या पाइनच्या सुगंधासोबत ट्रेकिंगची आनंद लुटता येईल.
राहुल गांधी लोकसभेच्या निवडणुकीत या ठिकाणी उभे राहिले आणि या ठिकाणाहून निवडून गेले. त्यामुळे या ठिकाणाविषयी अनेकदा वेगवेगळ्या चर्चा होताना दिसतात. मात्र वायनाड हे खरोखरच पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी सर्वोत्तम आहे. निसर्गदत्त वातावरणाचा चमत्कार अनुभवण्यासाठी एकदा वायनाडला भेट द्यायलाच हवी











