मुंबई : महान्यूज लाईव्ह
रिझर्व्ह बँकेने गेल्या काही दिवसांपासून आर्थिक क्षेत्रामध्ये कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. त्यांच्या नियमाला अनुसरून कामकाज करत नाहीत, अशा बँकांच्या तांत्रिक त्रुटी लक्षात घेत या बँकांना दंड ठोठावला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर सहकारी बँकांना दंड ठोठावल्यानंतर आता रिझर्व बँकेने मोठे पाऊल उचलत राष्ट्रीयीकृत बँकांना व खाजगी वित्तीय संस्थांना मोठ्या प्रमाणावर दंड ठोठावला आहे.
यामध्ये बंधन बँकेला एक कोटींचा, बँक ऑफ बडोदा दोन कोटींचा, बँक ऑफ महाराष्ट्र एक कोटींचा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडसइंड बँक, कर्नाटका बँक, करुर व्यास बँक, पंजाब अँड सिंध बँक, साऊथ इंडियन बँक लिमिटेड, जम्मू-काश्मीर बँक लिमिटेड, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या बँकांना प्रत्येकी एक कोटींचा तर स्टेट बँक ऑफ इंडिया 50 लाखांचा दंड ठोठावला आहे.
या बँकांनी बँकिंग रेगुलेशन अॅक्ट 1949 या कायद्याचे उल्लंघन केले असून मोठ्या प्रमाणावर कर्ज देताना काही तांत्रिक नियमांचा अवलंब केलेला नसल्याचा ठपका रिझर्व बँकेने या बँकांवर ठेवला आहे.











