इंदापूर : महान्यूज लाईव्ह
निमगाव केतकी येथील युवकाने राहत्या घरातील ॲंगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना मंगळवारी घडली.
सोमनाथ सुभाष मिसाळ (वय 29 वर्षे रा.निमगाव केतकी ता. इंदापुर जि.पुणे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत कृष्णा आबा लोंढे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. मंगळवारी (दिनांक 6 जुलै) सकाळी साडेदहा वाजण्याच्या पूर्वी सोमनाथ उर्फ डड मिसाळ याने आपल्या राहत्या घरातील ॲंगलला ओढणीने गळफास घेतला. सोमनाथ मिसाळ यास सरकारी दवाखान्यात दाखल केले असता, डॉक्टर डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले.
पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल खैरे हे करत आहेत.