पुणे : महान्यूज लाईव्ह
राज्यातील बहुचर्चित भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळा प्रकरणी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्या विरोधात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला आहे. पटेल यांनी पतसंस्थेच्या कोट्यावधी रुपयांचा मालमत्ता कमी किमतीत एकूण कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था बाराशे कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तेरा संचालकांसह अवसायक व इतरांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते आत्तापर्यंत बारा जणांना पोलिसांनी अटक केली असून भाजपचे विधानपरिषदेचे आमदार चंदूलाल पटेल हे देखील यामध्ये सहभागी असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.