सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना येणाऱ्या गळीत हंगामामध्ये बारा लाख टन उसाचे गाळप करेल असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर मिल रोलरचे पूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजन करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी हे पूजन केले.
यावेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, दत्तात्रय सपकाळ, एडवोकेट लक्ष्मणराव शिंगाडे, एडवोकेट रणजीत निंबाळकर, राजेंद्र गावडे, संतोष ढवाण, गोपीचंद शिंदे, गणेश झगडे, नारायण कोळेकर , दिपक निंबाळकर आदी संचालक उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष काटे म्हणाले, येणाऱ्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रामध्ये दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेनचा दोन लाख मेट्रिक टन ऊस गाळपास घेऊन पुढील हंगामात 12 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे संचालक मंडळाचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा भरती करण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात संचालक मंडळाने नुकतीच जामखेड, बीड भागातील व स्थानिक ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदारांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
या कंत्राटदारांचा करार करण्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. हंगामाच्या दृष्टीने मशिनरी ओव्हर ओईलींगची कामे चालू असून, ती वेळेत पूर्ण करून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कारखान्याचे दोन्ही प्लांट गाळपासाठी सज्ज ठेवले जाणार आहेत.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक ए. बी. जाधव, माजी संचालक भाऊसाहेब सपकाळ, कारखान्याचे सेक्रेटरी अशोक मोरे, स्थापत्य अभियंता तानाजी खराडे, तांत्रिक सल्लागार ए.पी. निकम, चीफ केमिस्ट सुनील पाटील, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे, कामगार कल्याण अधिकारी सपना ढगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत ठोंबरे, सुरक्षा अधिकारी डी. यू. पिसे कामगार नेते युवराज रणवरे, सतीश गावडे, दत्तात्रय निंबाळकर, संजय मुळीक आदी उपस्थित होते.