बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत नव्याने सुरु होत असलेल्या बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयात अधिकच्या 300 पोलिसांच्या जागा भरण्यास राज्याच्या वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. यातील 13 पदे ही बाह्य यंत्रणेमार्फत घेण्यास परवानगी देण्यात आली असून, 287 जागा या नियमित पदांमधून भरल्या जाणार आहेत.
बारामतीमधील बऱ्हाणपुर येथे जिल्ह्यातील दक्षिणेकडील तालुक्यांसाठी म्हणून उपमुख्यालय सुरू करण्यास राज्य शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार येथे लवकरात लवकर उपमुख्यालय उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या अधिकच्या जागांची आवश्यकता होती. त्यानुसार राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दिलेला 300 जागांच्या निर्मितीचा प्रस्ताव मुख्य सचिवांनी मंजूर केला असून, आता या तीनशे जागा भरल्या जाणार आहेत.