शीतल थोरात : महान्यूज लाईव्ह
कोल्हापूर : महिला पोलीस हवालदाराने वयोवृद्ध सासूवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, सदर घटना कसबा बावडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात सोमवारी मध्यरात्री घडली.
कौटुंबिक वादातून पोलिस हवालदार महिलेने सासूच्या तोंडावर पेट्रोल ओतून पेटविल्याची खळबळजनक घटना कसबा बावडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे रविवारी मध्यरात्री घडली. सदर वृद्ध सासू 80 वर्षीय असून, त्यांचे नाव आशालता श्रीपती वराळे आहे. त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
दरम्यान, जखमी वृद्ध महिलेवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. नात्याने सून असलेल्या पोलिस हवालदार संगीता राजेंद्र वराळे (51) हिच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल केला आहे.