शीतल थोरात : महान्यूज लाईव्ह
पुणे: पुणे शहर पोलिस दलाच्या विशेष शाखेत कार्यरत असणार्या श्रद्धा जायभाये (वय 28, रा. कावेरीनगर पोलिस लाईन, वाकड, मुळ रा. शेगाव) या महिला पोलिसने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मृत श्रध्दा जयभाये या पुणे पोलिस विशेष शाखेतील बंदोबस्त विभागात काम करत होत्या व त्यांचे पती इंडीयन नेव्हीमध्ये आहेत. त्यांना 4 वर्षाची मुलगी असून,त्यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचं कारण पोलिस शोधत आहेत.
श्रध्दा यांचा फोन लागत नसल्यामुळे त्यांच्या मैत्रिणीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिस श्रध्दा यांच्या राहत्या घरी पोहोचले. त्यावेळी दरवाजा बंद दिसल्यानंतर दरवाजा तोडून पोलीस आत गेल्यानंतर श्रध्दा यांचा मृतदेह ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.