सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोरोनाचा काळ कमी होताच, इंदापूर तालुक्यासाठी पुन्हा एकदा गुड न्यूज दिली आहे. इंदापूर तालुक्यातील विविध गावांमधील 146 विकास कामे मंजूर करताना दहा कोटी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये बहुतांश ठिकाणी सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, हायमास्ट दिवे, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत आदी कामांचा समावेश आहे.
दत्तात्रय भरणे यांनी मंजूर केलेल्या कामांमध्ये तरंगवाडी, शेटफळगडे, भांडगाव, लोणी देवकर, आजोती, सुगाव, थोरातवाडी, वडापुरी, निमगाव केतकी, निंबोडी, निमसाखर, वडापुरी, कचरवाडी, बेलवाडी, सराटी, चाकाटी, बावडा, बाभूळगाव, कुरवली, वडापुरी, लाकडी, निंबोडी, आनंदनगर, पळसदेव, डिकसळ, कळंब, शिरसोडी, गोंदी, काटी, रेडा, गोखळी, निमसाखर, रणगाव, दगडवाडी, बावडा, गलांडवाडी, अंथुर्णे, झगडेवाडी, बोरी, गोतोंडी, भरणेवाडी, पिंपरी बुद्रुक, सुरवड, न्हावी, निरनिमगाव, डाळज, वालचंदनगर, गिरवी, पिटकेश्वर, घोलपवाडी, हिंगणगाव आदी गावांचा समावेश आहे.
2 ते 70 लाखापर्यंत च्या कामाचा यामध्ये समावेश असून स्थानिक ठिकाणी मागणी करण्यात आलेली विकास कामे प्रामुख्याने यात प्राधान्याने मंजूर करण्यात आली आहेत. 25-15 लेखाशीर्ष योजनेअंतर्गत ही कामे मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.